महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी – दि. २५ मार्च – शहरात महापालिकेतर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण झाला आहे. लसीकरण केंद्रांची संख्या मंगळवारपासून (ता. २३) वाढविण्यात आली आहे. सध्या महापालिकेचे ३८ व खासगी १७ लसीकरण केंद्र सुरू आहेत. महापालिकेचे आणखी १२ केंद्रे पुढील दोन-तीन दिवसांत सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला नोंदणी केलेले आरोग्य सेवेतील कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये लस देण्यात आली. त्यानंतर साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वयोगटातील अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण सुरू केले आहे. आता लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. बुधवारपर्यंत (ता. २४) एक लाख ७ हजार २७ व्यक्तींनी लस घेतली आहे.
प्रभागनिहाय लसीकरण केंद्र
‘अ’ प्रभाग – नवीन आकुर्डी रुग्णालय, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण, इएसआय हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी सेंटर
‘ब’ प्रभाग – तालेरा रुग्णालय चिंचवड, किवळे दवाखाना, बिजलीनगर दवाखाना, पुनावळे दवाखाना, प्रेमलोक पार्क दवाखाना, काळेवाडी शाळा
‘क’ प्रभाग – साईजीवन प्राथमिक शाळा जाधववाडी, इंद्रायनीनगर क्रीडा संकुल, वायसीएम रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, दिनदयाळ शाळा
‘ड’ प्रभाग – पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, पिंपळे निलख दवाखाना, महापालिका शाळा वाकड, मारुती गेणू कस्पटे शाळा कस्पटे वस्ती वाकड, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, रहाटणी शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरी वाघेरे.
‘इ’ प्रभाग – नवीन भोसरी रुग्णालय, सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, छत्रपती शाहू महाराज विद्यालय दिघी, गंगोत्री पार्क दिघी, चऱ्होली दवाखाना
‘फ’ प्रभाग – संभाजीनगर दवाखाना, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, सेक्टिंग ग्राउंड सेक्टर २१ यमुनानगर, तळवडे समाज मंदिर, प्राथमिक शाळा नंबर ९२ मोरेवस्ती चिखली
‘ह’ प्रभाग – सांगवी महापालिका शाळा, कासारवाडी दवाखाना
‘ग’ प्रभाग – यशवंतराव प्राथमिक शाळा थेरगाव, खिंवसरा पाटील शाळा मंगलनगर थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर ‘महिलाराज’; चार समित्यांच्या सभापतीपदीही महिलाच
नियोजित केंद्र
‘ब’ प्रभाग – गुरुद्वारा वाल्हेकरवाडी
क प्रभाग – खराळवाडी माध्यमिक शाळा व नेहरूनगर उर्दू शाळा
इ प्रभाग – मोशी दवाखाना,
‘ह’ प्रभाग – लोकमान्य टिळक शाळा फुगेवाडी
ग प्रभाग – अशोक थियटरजवळील शाळा पिंपरी
शहरातील ६० वर्षांवरील व्यक्ती व ४५ ते ५९ वयोगटातील अतिजोखमीचे आजार असलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घ्यावी. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका