महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २६ मार्च – पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. शहरातील तरुण वयोगटाला सर्वाधिक लागण होत असल्याची स्थिती आहे. आता पर्यँत २२ ते ३९ या वयोगटातील ४१ टक्के नागरिकांना लागण झाली आहे. त्यामुळे तरुणांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या वयोगटातील नागरिकांना मध्ये लक्षण विरहित रुग्णांचे प्रमाण हे जास्त आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही यांच्यामुळे इतरांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षण विरहित आणि सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेले रुग्ण जास्त आहेत. परंतु अशा रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे येत दिसून आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे लक्षणे दिल्यास महापालिका केंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यावी. कोरोना काळात ठेऊन दिलेल्या नियमांचे पालन करावे. यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होईल. असे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले आहे.
वयोगटानुसार आता पर्यँत झालेली लागण
० -१२ : ८६१२
१३ – २१ : १००१९
२२- ३९ : ५१५०३
४०- ५९ : ३८२३२
६० पेक्षा जास्त : १७१२९