1 April या गोष्टी महागणार; पहा तुमच्यावर काय परिणाम होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २६ मार्च – आठवडाभरात नवीन एप्रिल महिन्यात प्रवेश होईल. येणाऱ्या 1 एप्रिल 2021 (1 April 2021) पासून सामन्यांवर चांगलाच आर्थिक बोजा पडू शकतो. एकीकडे दररोजच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्य हैराण असताना, आता दुसरीकडे 1 एप्रिलपासून दूध (Milk), एअर कंडिशनर (AC), पंखा (Fan), टीव्ही (TV), स्मार्टफोन्सच्या (Smartphones) किंमती वाढणार आहे. तसंच विमान प्रवास, टोल टॅक्ससाठीही अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.

1 एप्रिलपासून 3 रुपयांनी वाढणार दुधाचे दर – दुधाचे दर वाढवण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे.
आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर (Agra Lucknow Expressway) प्रवास करणं महागणार आहे. उत्तर प्रदेश एक्सप्रेस-वे औद्योगिक विकास प्राधिकरण बोर्डने (Uttar Pradesh Expressways Industrial Development Authority) 2021-22 साठी नव्या दरांना मंजुरी दिली आहे.
विमान प्रवासासाठी आता अधिक खर्च करावा लागणार आहे. केंद्र सरकारने डोमॅस्टिक फ्लाईट्सचं भाडं लोअर लिमिट 5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
1 एप्रिलपासून टेलिव्हिजनच्या किंमतीत 2000 ते 3000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
या उन्हाळ्यात नवा एसी किंवा फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मोठा झटका बसू शकतो. एप्रिलपासून AC कंपन्या किंमतींमध्ये वाढ करण्याच्या विचारात आहेत. कंपन्या कच्च्या मालाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे एसीच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. AC कंपन्या किंमतीत 4 ते 6 टक्के वाढ करण्याची योजना आखत आहेत.
कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मार्च महिन्यातच खरेदी करा. कारण एप्रिलपासून कार खरेदी करणं महागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *