इंग्लंडने टॉस जिंकला, टीम इंडियात एक बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २५ मार्च – भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडचा (India vs England) कर्णधार जॉस बटलर (Jos Buttler) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. इयन मॉर्गनला (Eoin Morgan) दुखापत झाल्यामुळे या मॅचमध्ये बटलरला नेतृत्व देण्यात आलं आहे. तसंच सॅम बिलिंग्स यालाही मागच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे तोदेखील टीमबाहेर आहे. दुसरीकडे भारतीय टीममध्ये एक बदल करण्यात आला आहे. श्रेयस अय्यरऐवजी (Shreyas Iyer) ऋषभ पंत (Rishabh Pant) याला संधी देण्यात आली आहे. पहिल्या वनडेमध्ये श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती, त्यामुळे अय्यर वनडे सीरिजमधून बाहेर झाला आहे. श्रेयस अय्यरऐवजी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) दुसऱ्या वनडेमध्ये संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा 66 रननी दणदणीत विजय झाला होता, यानंतर आता दुसरी वनडे जिंकून सीरिज खिशात टाकण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य असेल. याआधी टेस्ट सीरिजमध्ये भारताचा 3-1 ने आणि वनडे सीरिजमध्ये 3-2 ने विजय झाला होता.

भारतीय टीम

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा

इंग्लंडची टीम

जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, डेव्हिड मलान, जॉस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद, रीस टॉप्ले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *