कोरोनामुळे दहावी-बारावीची परीक्षा देता आली नाही तर काय? शिक्षणमंत्री यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २६ मार्च – मुंबई – महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन (Maharashtra SSC and HSC exam) पद्धतीनेच होणार हे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र दिवसेंदिवस कमालीने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, काहींना ही परीक्षा देणे खरोखरच जिकरीचे होणार आहे. अशात काय करायचे याबाबत शिक्षणंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना माहिती दिली आहे.

दहावी-बारावीची परीक्षा देता आली नाही तर काय?

@ कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा देता आली नाही, तर जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार
@ विद्यार्थ्याला किंवा त्याच्या घरातील सदस्याला कोरोना झाला, परिसरात कोरोनाबाधित अनेक असतील, इमारत/परिसर सील केला असेल, तर
विद्यार्थ्याने परीक्षा देऊ नये.
@ विद्यार्थी परीक्षेला येऊ शकला नाही तर, संबंधिक शाळा/महाविद्यालयाने विद्यार्थ्याची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे.
@ अशा विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार आहे.

इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *