गेल्या वर्षीभरात चांदीचा दर झाला इतका स्वस्त, ; जाणून घ्या किलोचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २६ मार्च – मुंबई – गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चांदीचा भाव 80 हजार रुपये प्रति किलोग्रॅमच्या जवळपास पोहोचला होता. त्यानंतर चांदीच्या दरात (Silver Rate Today) घसरण नोंदवली गेलीय. आज शुक्रवारी भारतीय वायदा बाजारात एमसीएक्सवर चांदीची किंमत आतापर्यंत 15 हजार रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत घसरलीय. आज चांदी 51 रुपयांच्या प्रति किलोग्रॅम तेजीसह 65 हजारांच्या दरम्यान व्यापार करत होती. चांदीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. (silver rate 26 march 2021 Silver is 15,000 cheaper so far than last year, know the price per kg 26 march 2021 silver rate in pune, mumbai, delhi, bangalore)

चांदीची किंमत शुक्रवारी सकाळी 9 वाजता वायदा बाजार मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 51 रुपये प्रति किलोग्रॅमच्या तेजीसह 64990 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यापार करत होती. तर गुरुवारी चांदीची किंमत 64869 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. तसेच चांदी 63411 रुपये प्रति किलोग्रॅमसह दिवसाच्या खालच्या पातळीवर आली होती.

गेल्या चार दिवसांबद्दल बोलायचे झाल्यास चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेलीय. गेल्या आठवड्यात चांदी 67,527 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. तर गुरुवारी चांदी 64,869 रुपये प्रतिकिलो ग्रॅमवर बंद झाली. चांदीच्या दराचा विचार केल्यास चांदी 2700 रुपये प्रति किलोग्रॅम स्वस्त झालीय. तर ऑगस्ट 2020 चांदी 79890 रुपये प्रति किलोग्रॅमसह उच्च स्तरावर पोहोचली आहे. तर चांदी आतापर्यंत 15000 रुपयांपर्यंत स्वस्त झालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *