महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २६ मार्च – मुंबई – सोशल मीडिया (social media) हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. हे माध्यम एखाद्या सामान्य व्यक्तीला देखील रातोरात सुपरस्टार बनवू शकतं. त्यामुळंच सतत चर्चेत राहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. परंतु यामुळं सेलिब्रिटींची प्राव्हसी देखीस आता पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. परिणामी यावर उपाय म्हणून अभिनेता रबी दुबे (Ravi Dubey) यानं सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. (Instagram account delete) त्यानं आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे.
रवीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. “मी पुढील काही दिवस इंस्टाग्राम डिलीट करत आहे.” अशा आशयाची पोस्ट त्यानं लिहिली आहे. ही पोस्ट वाचताच चाहते आणि त्यांचे जवळचे मित्र चकित झाले आहेत. प्रसिद्ध टीव्ही कलाकाराने हा असा निर्णय का घेतला?, हे प्रत्येकास जाणून घ्यायचे आहे.