सोनं खरेदीसाठी योग्य काळ ; सोनं झालं आणखी स्वस्त, पाहा आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ – मुंबई – सोन्या चांदीची आभूषणे शरीराची शोभा वाढवतात. सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याचांदीच्या आभुषणांचा पेहराव आपल्याकडे शुभ मानला जातो. सोन्याने साठी पार केल्याने सर्वसामान्य जनतेला सोन घेणं शक्य होत नव्हतं. पण आता सोनं पुन्हा पंचेचाळीस च्या आत आलंय. त्यामुळे सोनं खरेदीसाठी पुन्हा गर्दी पाहायला मिळतेय.

1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 4,376 इतकी आहे. हा दर काल 4,392 इतका होता. ज्यात 16 रुपयांनी घट पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 43,760 रुपये आहे. काल ही किंमत 43, 920 रुपये इतकी होती. यामध्ये सरासरी 160 रुपयांची घट पाहायला मिळाली.

24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत आज 4,476 इतकी आहे. हा दर काल 4492 इतका होता. ज्यात 16 रुपयांनी घट पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 44,760 रुपये आहे. काल ही किंमत 43, 920 रुपये इतकी होती. यामध्ये सरासरी 160 रुपयांची घट पाहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *