महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ – मुंबई – मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील 4 आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील 3 असे मिळून एकूण 7 दिवस बँकाचे कामकाज बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना एटीएम केंद्राचा आधार घ्यावा लागणार आहे. मात्र सतत आलेल्या या सुट्ट्यांमुळे एटीएमबाहेर रांगा लागण्याची शक्यता आहे. शिवाय एटीएममध्ये खडखडाट देखील होऊ शकतो. यामुळे बँकेत पैसे असूनही अनेकांचा खोळंबा होऊ शकतो.
बँका कधी बंद आणि कधी सुरू राहणार?
27 मार्च – महिन्यातील शेवटचा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
28 मार्च – रविवार असल्याने बँक हॉलिडे असेल.
29 मार्च – होळीची सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.
30 मार्च – यादिवशी बँका सुरू राहतील.
31 मार्च – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही.
1 एप्रिल – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही.
2 एप्रिल – गुड फ्रायडेची सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहतील.
3 एप्रिल – या दिवशी बँका सुरू राहतील.
4 एप्रिल – बँकांना रविवार आणि ईस्टर डेची सुट्टी असेल.