महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – अमरावती : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे राज्यातील कोरोना रुग्णांसंख्या वाढल्याने राज्यात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची दुसऱ्यांदा बाधा झाल्याचे समोर आले होते. तर, राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील दोनवेळा कोरोना होऊन गेला आहे. आता, पुन्हा एकदा त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
माझी प्रकृती ठिक नसल्यामुळे पुढील ३ दिवस कृपया कोणीही न विचारता भेटायला येऊ नये. ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली ती निगेटिव्ह आली आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम आवश्यक असल्यामुळे पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) March 27, 2021
बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना पुढील 3 दिवस कुणीही मला न विचारता भेटण्यासाठी येऊ नये, असे म्हटलंय. तसेच, ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली असून ती निगेटिव्ह आली आहे. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम आवश्यक असल्याने पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे, असे ट्विट कडून यांनी केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी दोनवेळा बच्चू कडू यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यावेळी, विलगीकरणात जाऊन उपचार घेतल्यानंतर ते बरे झाले होते.