Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
पुढील पाच दिवस संपूर्ण कोकणाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा - Maharashtra 24

पुढील पाच दिवस संपूर्ण कोकणाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – मुंबई : गुजरात आणि मुंबईसह संपूर्ण कोकणात शनिवारीही उष्णतेची लाट कायम होती. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या शहरांसह उर्वरित शहरांच्या कमाल तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सियसवर दाखल झाला असून, पुढील पाच दिवस संपूर्ण कोकणासह राज्यभरात बहुतांश जिल्ह्यांत कमाल तापमान चढेच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट जाणवत आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ६ अंशांची वाढ नोंदविण्यात येत असून, पालघर आणि रत्नागिरी येथे कमाल तापमान तब्बल ४० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत आहे. पुढील ५ दिवस संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडे राहील, तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक येथील हवामान उष्ण नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *