Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
राज्यात तापमानाचा पारा वाढला ; उद्या विदर्भात उष्णतेची लाट ? - Maharashtra 24

राज्यात तापमानाचा पारा वाढला ; उद्या विदर्भात उष्णतेची लाट ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. २९ – पंढरपूर – विशेष प्रतिनिधी – राज्यात उन्हाचे चटके अतिशय तीव्रतेने जाणवायला सुरुवात झाली आहे. राज्यभरातच पारा चढलेला दिसत आहे. अपेक्षेनुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथीलही तापमान वाढलेले दिसून येत आहे. विदर्भात ३० मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्याच्या अनेक भागात तापमानाचा कमाल पारा ४० अंश नोंदवला गेला आहे. मात्र आता हळुहळू उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथीलही तापमान वाढलेले दिसून येत आहे. कोकणातील तापमानवाढीचा फारसा त्रास जाणवत नसला तरी यंदा तिथंही पारा चढला आहे. शुक्रवारी रत्नागिरीत नोंदवलेले तापमान हे गेल्या २५ वर्षांमधील सर्वात उष्ण असे तिसऱ्या क्रमांकाचे तापमान आहे. या आधी २०११ आणि २००४ मध्ये तापमानाचा पारा अनुक्रमे ४०.६ आणि ४०.२ अंश सेल्सिअस नोंदला गेला होता. तर, उद्या व परवाही उन्हाचे चटके अतिशय तीव्रतेने जाणवणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *