महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पुणे । दि. ३० मार्च ।राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. जलसंपदा विभागाने जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात शेतीसाठी पाणी मुठा उजवा कालव्यातून घेतले आहे. दुसरे उन्हाळी आवर्तन घ्यायचे किं वा कसे? याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. पुणे शहराला भामा आसखेड धरणातून २.६४ अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणी मिळणार असल्याने शहराला खडकवासला धरणातून देण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कपात करता येईल, असे जलसंपदा विभागाकडून बैठकीत सांगण्यात आले. मात्र, त्याला महापालिके ने विरोध दर्शवत खडकवासला धरण साखळी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीकपात नको, अशी भूमिका मांडली.
धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून करोनाच्या पाश्र्वभूमीवर शहराला पाण्याची गरज आहे. अर्थसंकल्प मांडताना प्रत्येक बाबींचा गांभीर्याने विचार के ला जातो, तसेच पाण्याचे नियोजन होण्यासाठी दर महिन्याला पाण्याचा आढावा घेण्याची सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बैठकीत के ली. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी पाण्याच्या आढाव्यासाठी बैठक घेण्याचे जाहीर के ले.
पुणे महापालिके कडून ‘सातही दिवस चोवीस तास’ ही पाण्याची योजना राबवण्यात येत आहे. तसेच जायकाची नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती महापालिके च्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांनी बैठकीत दिली.
धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा
टेमघर ०.४६ (१२.२९), वरसगाव ७.४६ (५८.१८), पानशेत ७.६४ (७१.७४) आणि खडकवासला ०.९४ (४७.७०)
चारही धरणांत मिळून एकूण १६.५० टीएमसी (५६.५९)