दिल्लीच्या पब बाहेर मारहाणीचा व्हिडियो होतोयं व्हायरल; अभिनेत्याने पोस्ट शेअर करत सांगितले सत्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ३१ – भारतीय बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला दिल्ली येथील पबबाहेर मारहाण केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दावा करण्यात येतोयं की, अभिनेता अजय देवगनचे पबच्या बाहेर भांडण झाले आणि या भांडणात लोकांनी त्यांना जोरदार मारहाण केली. यासंबंधी अजय देवगनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत हा व्हिडीओ बनावट असल्याचे सांगितले.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने आपल्या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट शेअर करत त्या गोष्टीचे खंडन केले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहले की, ” असे वाटत आहे की, माझ्यासारख्या दिसणारा कोणीतरी व्यक्ती अडचणीत सापडला आहे. मला या व्हिडीओसंबंधी मोठ्या प्रमाणात कॉल येत आहे. मी स्पष्ट करतो की, मी कुठेही प्रवास केला नसून माझ्याबाबतीत चालणारा बातम्या निराधार आहेत. हॅप्पी होळी.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *