महाराष्ट्र २४ मुंबई : दिल्ली, बंगळुरू असो किंवा मुंबई, सर्वच ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या आहे. सिग्नल लागल्यानंतर काही सेकंदही थांबण्याचा वाहन चालकांना संयम नसतो. ते जोरजोरात हॉर्न वाजविणे सुरू करतात. यावर तोडगा म्हणून मुंबई पोलिसांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
हॉर्नच्या आवाजाने ८५ डेसिबल्सची मर्यादा ओलांडल्यास सिग्नल रिसेट होईल. त्यामुळे वाहनचालकांना सिग्नलवर जास्त वेळ थांबावे लागणार आहे. मुंबई पोलिसांनी सिग्नल परिसरात आवाज मोजणारी यंत्रणा लावली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी ट्वीट केला आहे. यामध्ये सिग्नल परिसरातील दुभाजकावरील यंत्रणेत हॉर्नच्या आवाजाची तीव्रता मोजणारा डेसिबल मीटर बसविण्यात येणार आहे.या मीटरद्वारे वाहन चालकांकडून वाजविण्यात येणाऱ्या हॉर्नची तीव्रता तपासण्यात येणार आहे. ती ८५ डेसिबलपेक्षा जास्त झाल्यास सिग्नल रिसेट होतो. त्यामुळे वाहन चालकांना जास्त वेळ सिग्नलवर जास्त वेळ थांबावे लागणार आहे. सिग्नलवर मोठमोठ्याने हॉर्न वाजविण्यापेक्षा संयम ठेवून सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहणे, हे वाहन चालकांना शिकविण्यासाठी पोलिसांनी हा प्रयोग केला आहे