Budget 2020 – अर्थमंत्री आज करु शकतात या 5 मोठ्या घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा बजेट आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थे पुढे सध्या अनेक आव्हानं आहेत त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात. अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

यंदाच्या बजेटमध्ये काय घोषणा होणार?

1. यंदा बजेटमध्ये टॅक्स स्लॅबची सीमा वाढवली जाण्याची शक्यता आहे.
2. महिलांच्या सुरक्षेततेसाठी काही घोषणा होऊ शकतात.
3. शिक्षणावर १ लाख कोटीपेक्षा अधिकची तरतूद केली जावू शकते.
4. रोजगार वाढवण्यासाठी छोट्या उद्योगांना पॅकेज दिले जावू शकते.
5. घरगुती उत्पादनांना चालना देण्यासाठी इतर प्रोडक्टवर इंपोर्ट ड्यूटी लावली जावू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *