महाराष्ट्र २४- अर्थसंकल्पाविषयीच्या ‘या’ पाच रंजक गोष्टी
१. १९९१ साली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री असताना १८,६५० शब्द असलेले सर्वात जास्त वेळ चाललेले अर्थसंकल्पाचे भाषण केले.
२. प्रणव मुखर्जी यांनी सातवेळा अर्थसंकल्प सादर केला. तर डॉ. मनमोहन सिंग, यशवंत सिन्हा आणि अरूण जेटली यांनी सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
३. १९५९ साली अर्थमंत्री झालेल्या मोरारजी देसाई यांच्या नावावर सर्वाधिक जास्त म्हणजे १० वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.
४. निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.
५. आर. वेंकटरामन हे एकमेव अर्थमंत्री होते, ज्यांना भारताचे राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला