योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी पिणे आहे शरीरास फायदेशीर, हे आजार पळून जातील

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १ एप्रिल । आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे हे सांगण्याची गरज नाही. शरीराची सर्व कार्ये चांगल्या प्रकारे केली जातात आणि आपण रोगांपासून दूर राहतो. त्यातही पाण्याची महत्त्वपूर्ण भूमिका (Importance of Water)असते. उन्हाळा अर्थात ग्रीष्म ऋतू (Summer Season) सुरु झाला आहे . या काळात शरीरातील पाण्याचे प्रमाण नेहमीच योग्य राखले पाहिजे, हे खूप महत्वाचे आहे. तीव्र उष्णतेमुळे, शरीरातून घामाच्या स्वरुपात पाणी खूप वेगाने कमी होण्यास सुरुवात होते. जर पाणी कमी झाले (Dehydration) होत असेल तर उष्माघाताची शक्यता देखील वाढते. म्हणून, पाणी पिणे फार महत्वाचे आहे. Right time to drink Water:

पाणी पिण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती आहे,आपल्याला माहीत आहे काय ? आपण कोणत्या वेळी पाणी प्यावे आणि कोणत्या वेळी नाही? जेव्हा पाणी योग्य वेळी आणि योग्य मार्गाने प्यालेले (Right time to drink water) असते तेव्हा त्याचे फायदे आणखी वाढतात. विज्ञानाने हे देखील सिद्ध केले आहेत. योग्य वेळी पाणी पिण्यामुळे पोटदुखी, थकवा, जास्त प्रमाणात खाणे, उच्च रक्तदाब आणि बद्धकोष्ठता यासारखे आजार टाळण्यास मदत होते. म्हणून येथे, पाणी कधी प्यावे हे जाणून घ्या:

1. सकाळी उठल्यावर लगेच (After waking up) 1 ग्लास पाणी नक्कीच प्या. असे केल्याने, शरीराची विषारी द्रव्ये बाहेर पडतात, शरीराची सर्व अवयव योग्यप्रकारे कार्य करतात आणि दिवसभर आपल्यात चांगली ऊर्जी टिकून राहते.

2. जेवणाच्या 30 मिनिटांपूर्वी (30 mins before meal)पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जेवणापूर्वी पाणी पिण्यामुळे आपले पोट भरले असल्याचे जाणवते. त्यामुळे आपण जास्त कॅलरी घेत नाही आणि पचन देखील चांगले होते.

3. आंघोळ केल्यावर १ ग्लास पाणी प्यावे. (After taking bath)असे केल्याने, आपले रक्त परिसंचरण व्यवस्थित राहते आणि रक्तदाब समस्येवर मात करण्यास मदत होते. तथापि, आंघोळीनंतर थंड पाणी पिणे टाळा. शक्य तितक्या सामान्य किंवा कोमट पाणी प्या.

4. झोपेच्या आधी (Before sleeping) पाणी पिण्यामुळे तुमचे शरीर रात्रभर हायड्रेट राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होईल. तथापि, जास्त पाणी पिऊ नका, किंवा आपल्याला रात्री पुन्हा पुन्हा टॉयलेटला जाण्याची आवश्यक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *