महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि. २ एप्रिल । संपादक ; सुनील आढाव । दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. आरोग्य व्यवस्था जोरात कामाला लागली आहे. मात्र तरीही रुग्ण संख्या काही कमी होत नाही. परिणामी कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेखोरपणे पालन करा. शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकू. आपल्याला शहरातून कोरोना हद्दपार करायचा आहे. असे आवाहन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड करांना केले आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि प्रतिबंधक उपाययोजनांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कौन्सिल हॉल येथे बैठक झाली. बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये वाढता कोरोनाचा आकडा पाहता जिल्ह्यात टाळेबंदी न करता पुढील ७ दिवसांसाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यावेळी संध्याकाळी सहा ते सकाळी सहा दरम्यान पुण्यात संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सकाळी ६.० ते सायंकाळ ६ पर्यंत जमावबंदी राहील, यामधून अत्यावश्यक सेवा यांना सवलत राहील याचबरोबर हॉटेल, मॉल आणि बार दोन आठवडयांसाठी पुर्णपणे बंद असतील,फक्त होम डिलिव्हरी सुरू राहणार, आठवडी बाजार बंद राहतील तर शाळा आणि महाविद्यालयांना ३० एप्रिलपर्यंत सुट्टी राहणार आहे. यामधून १० व १२ वी च्या विद्यार्थी यांना सूट राहील , पुर्वनियोजित परीक्षा वेळेत घेण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. लग्न आणि अंत्यसंस्कार सोडून सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. पूर्वीचे निर्बंध आहे तसेच राहतील सुपर स्प्रेडर संवर्गातील व्यक्तीची RTPCR चाचणी करणे बंधनकारक करणे.
पिंपरी-चिंचवड, पुणे कोरोनाचा आकडा कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्ष भरापासून आरोग्य यंत्रणेवर खूप तणाव आहे. ही येणारी दुसरी लाट पहाता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, वेळीच ह्यावर नियंत्रण मिळ्वण्यासाठी आज उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.