महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ३ एप्रिल ।राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंता व्यक्त केली. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी जनतेला संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. मार्चच्या आधीपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
# लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे.
# जर ही परिस्थिती अशीच राहिली तर पूर्ण लॉकडाऊन करावे लागेल की काय अशी शक्यता .
# लॉकडाऊन घातक आहे. पण कात्रीत आपण सापडलो आहे.
# मास्क न लावण्यामध्ये काय शौर्य आहे. मास्क लावताना लाजायची गरज नाही.
# नवीन नियम लवकरच जाहीर करेल.
# खाजगी कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.
# रेल्वे तुडूंब भरुन जात आहेत. हॉटेलमध्ये गर्दी आहे.
# जीव वाचवायचा की रोजगार. रोजगार परत मिळेल. जीव नाही मिळणार.
# संसर्गाची साखळी तोडायची आहे. लस घेतल्यानंतर ही कोरोना होता. तो दुसऱ्याला संसर्ग करु शकतो. # कोरोनाची दहशत कमी झाली आहे. आपण गाफील झालो.
# कोरोनावर मात करायची आहे.
# पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा देत आहे.
#लाटे मागून लाट येत आहे.
# कोरोनाची लाट रोखून पुढची लाट रोखायची आहे.