छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला; २२ जवान धारातीर्थी,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ४ एप्रिल – छत्तीसगडमधील बस्तरच्या बीजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले. यातील काही जवानांचे मृतदेह हाती आले आहेत. या चकमकीत अनेक जवान बेपत्ता आहेत. बीजापूरच्या तर्रेम भागातील जोनागुडाच्या डोंगरांमध्ये नक्षलवाद्यांनी जवळपास ७०० जवानांना घेरलं होतं. ४ तास ही चकमकत चालली. या चकमकीत ९ नक्षलवादीही ठार झाले. तर जवळपास ३२ जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, स्थानिक पत्रकारांच्या गटाने आज सकाळी घटनास्थळी भेट दिली.

त्या ठिकाणी २२ जवान शहीद झाल्याचं त्यांना दिसून. अजूनही बचाव पथक पोहोचलं नसल्याची माहिती. बेपत्ता जवानांचा शोध सुरू असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. नक्षलवादी हल्ल्यात ३२ जवान जखमी झाले आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शहीद जवानांबद्दल शोक व्यक्त करत कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली. यासोबच पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी नक्षलवाद्यांना गंभीर इशाराही दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *