महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. ४ एप्रिल – गृह मंत्रालयाच्या वतीने डायरेक्टर, टेक्निकलसह 22 पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 मार्चपासून सुरू झाली आहे, जी 30 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज भरुन ऑफलाइन अर्ज करू शकतात.
पदांची संख्या – 22
पात्रता ; मंत्रालयाने विविध पदांवर अर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या पात्रता निर्धारित केल्या आहेत. इच्छूक उमेदवार अधिकृत अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रतेविषयी सविस्तर माहिती मिळवू शकतात.
वयोमर्यादा ; या पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
आवश्यक तारखा
अर्ज सुरु झाल्याची तारीख – 23 मार्च
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 30 एप्रिल
अर्ज कसा करावा
इच्छुक आणि पात्र उमेदवार विहित नमुन्यात अर्ज भरुन खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात-
अंडर सेक्रेटरी, लँड पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया,
पहिला मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली – 110003
https://www.mha.gov.in/sites/default/files/FillingpostsICPsdeputation_25032021.pdf?ref=inbound_article?ref=inbound_article