Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
'लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो' उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना फोन - Maharashtra 24

‘लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो’ उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना फोन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ४ एप्रिल । राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी राज ठाकरे यांना फोनवरील संवादात केली. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊन करण्याचे संकेत देखील मुख्यमंत्र्यांनी दिले. पण पुन्हा लॉकडाउनला विरोधी पक्ष भाजपासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील विरोध दर्शवलेला आहे.

कोरोनाचा वाढता उद्रेक पाहाता आज मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर संपर्क साधत सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या संवादाची माहिती मनसेकडून ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *