पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराचा धडाका ; भर प्रचारसभेत जयंत पाटलांनी तोंडावरचा मास्क काढला अन् म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पंढरपूर – दि. ४ एप्रिल – राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराचा धडाका लावला आहे. पाटील यांनी प्रचारसभांवर भर दिला असून आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना निवडून देण्याचं आवाहन करत आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पाटील यांनी एका प्रचारसभेत चक्का मास्क काढून भाषण केलं. बरं, नुसता मास्क काढून पाटील थांबले नाहीत, तर मास्क काढण्याचं समर्थनही त्यांनी केलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (jayant patil reaction on corona surge)

आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात आज सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला जयंत पाटलांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी तुमचे चेहरे बघितल्यावर जगात कोरोना नसल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे मीही मास्क काढूनच बोलतो, असं म्हणत पाटील यांनी चक्क मास्क काढून भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झालेली असताना पाटील यांनी मात्र, मास्क काढण्याचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *