महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ४ एप्रिल ।जॅकलिन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. नुकतंच ‘रामसेतु’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. आता या सेटवरील फोटो तिचा फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी सांगितले की, येत्या काही महिन्यांत चित्रपटाचे 80 टक्के शेड्युल अयोध्येत शूट केले जाईल. त्यानंतरच्या शेड्युलचे शूटिंग मुंबईत होणार आहे.जॅकलिन फर्नांडिसबरोबरच आता या चित्रपटात नुसर्रत भरुचा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अक्षय कुमारसोबत नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत झळकण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला आहेत. नुसरत आता बॉलिवूडमध्ये सतत काम करताना दिसतेय. त्यामुळे प्रेक्षकही तिला प्रचंड प्रेम देत आहे.एकूणच जॅकलिनचा हा लूक बघून आता चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.