महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -मुंबई – दि. ५ एप्रिल – प्रत्येक शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2021) सामने मुंबईत होणार की नाही, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम होतं. पण, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक ( Maharashtra Cabinet Minister Nawab Malik ) यांनी आयपीएल २०२१चे सामने ठरल्याप्रमाणे मुंबईतच होतील, अशी माहिती दिली.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे ( Delhi Capitals vs Chennai Super Kings opening game in Mumbai). मुंबईत एकूण १० सामने होणार आहेत. त्यात मुंबईत दाखल झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) व दिल्ली कॅपिटल्स ( DC) या संघातील प्रमुख खेळाडूला कोरोना लागण झाली आहे. शिवाय वानखेडे स्टेडियमवरली ८ कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे हे सामने इतरत्र हलवले जातील अशी चर्चा सुरू झाली होती. BCCIनं त्यासाठी हैदराबाद व इंदूर हे पर्याय राखून ठेवले होते. पण, आता हे सामने मुंबईतच होतील, परंतु BCCI व IPL फ्रँचायझींना महाराष्ट्र सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल, असे मलिक यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले,”नियमांचे पालन करूनच सामन्यांना परवानगी देण्यात आली आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बंदी असेल. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला एकाच ठिकाणी आयसोलेशनमध्ये रहावे लागेल. जास्त लोकं जमता कामा नयेत. या सर्व अटी मान्य केल्यानंतर आम्ही परवानगी दिली आहे.”
वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने
१० एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स
१२ एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स
१५ एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स
१६ एप्रिल – पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स
१८ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब किंग्स
१९ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
२१ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स
२२ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स
२४ एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
२५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू