महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – शिर्डी – दि. ५ एप्रिल – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या “ब्रेक दि चेन” या धोरणांतर्गत आज, सोमवार सायंकाळपासून ते ३० एप्रिलपर्यंत साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.
याशिवाय साईसंस्थानची भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद असेल. प्रसादालय व कॅन्टीन सुद्धा बाहेरून येणा-या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसादालयात केवळ रूग्णालय व कोवीड सेंटरच्या रूग्णांसाठीच जेवण बनवले जाणार असल्याचेही रविंद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण प्रमुख परदेशी तसेच विविध विभागांच्य प्रमुखांची उपस्थिती होती.