महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. ७ एप्रिल । तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलण्यात आल्या नाहीत. आज किंमती स्थिर राहिल्यानंतरही राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.56 रुपये आहे. तर आज इथे डिझेलची किंमत प्रति लिटर 80.87 रुपये आहे. त्याचप्रमाणे आर्थिक राजधानी मुंबईत आज पेट्रोलची किंमत 96.98 रुपये तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 87.96 रुपये आहे. इंडियन ऑईलच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती घेण्यात आली आहे.
वेगवेगळ्या राज्यात आकारण्यात येणाऱ्या करांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तफावत आहे. याशिवाय इंधनाच्या वाहतुकीच्या शुल्कामध्येही फरक आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांचे अपडेट
अहमदनगर – 96.87
अकोलो – 96.85
अमरावती – 97.70
औरंगाबाद – 98
कोल्हापूर – 97.11
नागपूर – 97.01
नाशिक – 97.13
पुणे – 96.89