नोकरी विषयक ; बँक ऑफ बडोदामध्ये विविध ५११ जागांसाठी नोकर भरती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.१० एप्रिल । विविध ५११ जागांसाठी बँक ऑफ बडोदामध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून याबाबती माहिती दिली आहे. २९ एप्रिल या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

आठ विविध पदांसाठी ५११ जागांची भरती प्रक्रिया बँक ऑफ बडोदाने एकूण राबवली आहे. यात सिनियर रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी ४०७ जागा, टेरिटरी हेड पदासाठी 44 जागा, ग्रुप हेड पदासाठी 06 जागा, प्रोडक्ट हेड (इन्वेस्टमेंट & रिसर्च) पदासाठी 01 जागा, हेड (ऑपरेशन्स & टेक्नोलॉजी) 01 जागा, आयटी फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर पदासाठी 01 जागा, अशा एकूण ५११ जागा भरल्या जाणार आहे.Bank of Baroda Recruitment 2021 नुसार या सर्व पदांसाठी अर्ज दाखल करण्याआधी उमेदवाराने मान्याप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच या सर्व पदांसाठी कमीत कमी २ वर्षे ते जास्तीत जास्त १० वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

या उमेदवारांना वयाची अट २३ वर्षापासून ते जास्तीत जास्त ४५ वयो वर्षापर्यंत ठेवण्यात आली आहे. पण प्रत्येक पदानुसार वयाची मर्यादा बदणारी आहे.
या पदांवर सामान्य आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना ६०० रुपये तर एसटी, एससी, पीडब्यूडी वर्गात येणाऱ्या १०० रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे.
तुम्ही या पदासाठी Bank of Baroda च्या अधिकृत वेबसाईट https://easiest.bobinside.com:8443/recruitment-wealthmanagement/
वर जाऊन अर्ज करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *