महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १० एप्रिल । आजची लढत भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज , गुरू-शिष्यांमध्ये अर्थात महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा वारसदार म्हणून पाहिले जात असलेला रिषभ पंत उद्या आयपीएलच्या दुसऱ्याच दिवशीच आमनेसामने येत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातो सामना होत असला, तरी अनुभवी धोनीच्या विरुद्ध पंत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाला गत आयपीएल स्पर्धेत उपविजेतेपदापर्यंत मजल मारता आली होती; तर अनुभवी चेन्नईचा संघ अमिरातीत झालेल्या त्याच स्पर्धेत सातव्या स्थानापर्यंत घसरला होता; परंतु आता दोन्ही संघात काही बदल झाले आहेत. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे रिषभ पंतवर नेतृत्वाची जबाबदारी आहे; तर धोनीच्या संघात सुरेश रैना, द्वेन ब्रावो असे खेळाडू पुन्हा एकदा संघाला गतवैभव मिळवून देण्यास सज्ज झाले आहेत.
दिल्लीची ताकद कागिसो रबाडा आणि नॉर्कया या वेगवान गोलंदाजांमध्येही आहे; परंतु उद्याच्या पहिल्या सामन्यासाठी ते उपलब्ध नसतील. त्यामुळे उमेश यादव, ईशांत शर्मा, ख्रिस वोक्स यांच्यावर मदार असेल. अश्विनच्या रूपाने त्यांच्याकडे अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला चेन्नईला फलंदाजी ही शेवटच्या क्रमांकापर्यंत आहे. पंत समोर त्यांना थोपवण्याचे आव्हान असेल .
चेन्नई वि. दिल्ली
(एकमेकांविरुद्ध २३ लढती)
१५ विजय ८
२२२ सर्वोत्तम १९८
११० नीचांक ८३