आत्मा मालिक ललित कला अकादमीने सलग तिसऱ्या वर्षी पटकावला सकाळ एन आय ई नाट्य करंडकासह तब्बल ११ पारितोषिके

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – अहमदनगर :- कला , क्रीडा व शैक्षणिक संकुल म्हणून देशभरात नावाजलेल्या आत्मा मालिक ध्यानपीठ तथा विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक ललित कला अकादमी च्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करून शाळेच्या नावलौकिकात भर पाडली आहे सालाबादप्रमाणे अहमदनगर येथे झालेल्या सकाळ एन आय ई आयोजित आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे आयोजन केले होते या मध्ये एकूण २४ बालनाट्य प्रयोग सादर करण्यात आले होते.यामध्ये एक नाही दोन नाही तीन नाही तर…तब्बल ११ पारितोषिके मिळाले.

या पैकी आत्मा मालिक ललित कला अकादमी निर्मित “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” ‘ “जागर” , “नाटकाचे झाले नाटक ” या तीन बालनाट्यांला सर्वाधिक जिल्हात बक्षीस मिळाले.यात आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलास “ताटी उघडा ज्ञानेश्वरा ” या नाटकास ,सांघिक पारितोषिक नाटक -प्रथम क्रमांक ,रोख रक्कम ३०००रुपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र ,उत्कृष्ट लेखक- प्रथम क्रमांक पांडुरंग घाग्रेकर प्रमाणपञ, उत्कृष्ट दिग्दर्शक- प्रथम क्रमांक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र,उत्कृष्ट नेपथ्य-प्रथम क्रमांक सन्मान चिन्ह व प्रमाणपञ,उत्कृष्ट स्त्री अभिनय -द्वितीय क्रमांक अनुजा बोडखे ( पात्र विसोबा ) प्रमाणपञ, उत्कृष्ट स्त्री अभिनय -उत्तेजनार्थ श्वेता निरभवने (पात्र संत मुक्ता बाई)प्रमाणपत्र ,तर आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे बालनाट्य “नाटकाचे झाले नाटक” यास विनोदी अभिनय अभिनेता -प्रथम क्रमांक यज्ञेश देशमुख (पात्र भडजी)प्रमाणपत्र ,विनोदी अभिनय अभिनेता -द्वितीय क्रमांक वेदांत भाकरे (पात्र सूत्रधार)प्रमाणपञ, विनोदी अभिनय अभिनेत्री -तृतीय क्रमांक साक्षी पवार( पात्र बोबडी मुलगी)प्रमाणपञ, तर तिसरे बालनाट्य ओम गुरुदेव इंग्लिश मिडीयम गुरुकुलाचे “जागर” यास सांघिक पारितोषिक नाटक-उत्तेजनार्थ क्रमांक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र ,उत्कृष्ट पुरुष अभिनय-उत्तेजनार्थ क्रमांक दीपक पवार (पात्र वेडा) यांना मिळाले. तर यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला.ललित कला अकादमीच्या या यशाबद्दल सर्व बालकलाकारांचे प.पू सद्गुरु विश्वात्मक आत्मा मालिक माऊली ,आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष प.पू संत परमानंद महाराज,संत निजानंद महाराज ,आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,उपाध्यक्ष भगवान दौंड,कोषाध्यक्ष विठ्ठल होन,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,विश्वस्त प्रकाश भट,वसंत आव्हाड,प्रकाश गिरमे,बाळासाहेब गोर्डे,प्रभाकर जमधडे,व्यवस्थापक हिरामण कोल्हे,प्राचार्य निरंजन डांगे,माणिक जाधव,कांतीलाल पटेल,संदिप गायकवाड,मिना काकडे,नामदेव डांगे,सुधाकर मलिक,रमेश कालेकर,नितीन सोनवणे,वंदना थोरात ,सुरेश शिंदे,मेजर रमेश भगत व सर्व विभाग प्रमुख शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. या सर्व बालकलाकारांना जेष्ठ रंगकर्मी मा.पांडुरंग घांग्रेकर,ललित कला अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी .योगेश निळे,सुवर्णा निळे,अमोल नलावडे,योगेश पवार,आदिक कुदनर,रोहिणी कचरे,योगिनी पवार,रेणुका जाधव,उषा परजने, मयुरी सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, वसंत नारद,समाधान चव्हाण,विलास म्हस्के, ज्ञानेश्वर भिंगारे,दिपक सूर्यवंशी, वैभव गाढवे,करण राख,गौतम रसाळ,हर्षल नलावडे,तेजस सागर,मंगेश उंबरकर,उद्धव विधाटे आदींचे दिग्दर्शन तथा मार्गदर्शन लाभले.या यशासाठी आत्मा मालिक ललित कला अकादमीने अथक परिश्रम घेतले.अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश निळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *