Gold price today : सोने-चांदी गुंतवणूकिची उत्तम संधी, पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।नवीदिल्ली । दि.१२ एप्रिल । 24 कॅरेट सोन्याचे दिल्लीतील आजचे दर 49820 प्रति दहा ग्रॅम आहेत. तर, चेन्नईमध्ये 47,720, मुंबईमध्ये 45,720 आणि कोलकातामध्ये 48,570 प्रति दहा ग्रॅम आहेत.

सोनं खरेदीसाठी सध्या उत्तम वेळ आहे. जेणेकरुन दर वाढताच चांगलं रिटर्न मिळवता येईल. सध्या सोन्याचे दर 46 हजाराच्या आसपासच आहेत. मात्र, एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत दर भरपूर वाढण्याची शक्यता आहे. कारण, मे महिन्यात अक्षय तृतीया आहे. या मुहूर्तावर अनेक लोक सोनं खरेदी करतात.

संपूर्ण जगात पुन्हा एकदा कोरोनाची गती वाढत असल्याने, गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा एकदा कमी झाला आहे आणि ते सुरक्षित गुंतवणूकीकडे आकर्षित होऊ लागले आहेत. म्हणूनच होळीपासून सोन्या-चांदीमध्ये निरंतर वाढ होत आहे. गेल्या एक आठवड्यात ज्या पद्धतीने हा ट्रेंड चालू राहतो त्यानुसार लवकरच सोने 50 हजाराचे होईल, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मार्चमध्ये देशात सोन्याची आयात 160 टनांच्या विक्रमी पातळीवर गेली. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात 471 टक्के वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमतीतील घट आणि आयात शुल्कात घट यामुळे किरकोळ ग्राहक आणि दागिने विक्रेत्यांचा सोन्याकडे कल आहे. (gold price today 12 april 2021 mcx gold rate increase in delhi market)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *