महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।नागपूर । दि.१२ एप्रिल । येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकरी जनतेने घरूनच साजरी करावी, असे आवाहन दीक्षाभूमी स्मारक समितीने केले आहे.
२०२० मध्ये काेरोनामुळे आंबेडकरी अनुयायांना कोणतेही सण व उत्सव साजरे करता आले नाही.पण, आंबेडकरी जनेतेने अभूतपूर्व संयम दाखवित सर्व सण उत्सव घरूनच साजरे केले. कोरोनाची परिस्थिती याही वेळी बदललेली नाही. उलट अधिक भयावह झालेली आहे. ते लक्षात घेता आंबेडकरी जनतेने याही वर्षी संयम दाखवित आंबेडकर जयंती घरूनच साजरी करावी,असे आवाहन स्मारक समितीतर्फे केले आहे.