महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि.१२ एप्रिल । विकेंड लॅाकडाऊननंतर आज राज्यभर झालेली गर्दी घातक ठरणार आहे . भविष्यात भयावह अशी स्थिती होणार, म्हणून १० दिवसांपीसून मी कडक लॅाकडाऊनची मागणी करतोय, राज्यात सध्या लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही , एक आठवडा किंवा १४ दिवस लॅाकडाऊन ? याबाबत कॅबीनेट बैठकीत चर्चा होणार असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले ,
मुंबई लोकलची गर्दी थांबावी लागेल ,मुंबई लोकल बंद करायची की निर्बंध लावायचे, यावर कॅबीनेट बैठकीत निर्णय, मे शेवटीपर्यंत ही विस्फोटक परिस्थिती राहील, राज्यात लस संपलीय, अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झालंय ,गुढीपाडवा आणि १५ एप्रिलनंतर लॅाकडाऊन बाबत निर्णय , लॅाकडाऊन मध्ये गरीबांना मदतीसाठी अर्थमंत्री नियोजन करतायत, माणसं मरत आहेत, लसीकरण उत्सव कसला? कुणी उपकाराची भाषा करत असेल, तर तो पदाशी बेईमानी करतोय, कोरोनावर विजय मिळवल्यानंतर उत्सव करता येईल , विरोधकांनी राजकारण करु नये,