महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि.१२ एप्रिल । देशात करोनाची दुसरी लाट आली असून दैनंदिन रुग्णसंख्येने दीड लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे नजीकच्या काळात कठोर टाळेबंदी होणार या भीतीने आज गुंतवणूकदारांची गाळण उडाली. भांडवली बाजार उघडताच झालेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली आहे. अवघ्या १५ मिनिटांत गुंतवणूकदारांची मालमत्ता ७ लाख कोटींनी कमी झाली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला असून निफ्टीत ३५९ अंकांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारात देखील आज मोठी पडझड दिसून आहे. आज गुंतवणूकदारांनी बँका, वित्त संस्था, ऑटो या क्षेत्रात विक्रीचा मारा सुरु ठेवला आहे. राज्यात कोणत्याही क्षणी कठोर लाॅकडाउनची घोषणा होण्याची शक्यता आहे तर केंद्र सरकारकडून देखील कठोर निर्बंध लागू केले जातील या भीतीने गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढण्याचा सपाटा लावला असल्याचे शेअर दलालांनी सांगितले. मात्र आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे किमान सात लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
https://twitter.com/BSEIndia/status/1381462324901339138?s=20