महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१३ एप्रिल । संजू सॅमसनच्या (Sanju Samson) धडाकेबाज शतकानंतरही राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) हातात आलेली मॅच केवळ 4 धावांनी गमवावी लागली. मला कोणत्याही परिस्थितीत राजस्थान रॉयल्सला जिंकवून द्यायचं होतं. पण मी खेळलेल्या खेळीपेक्षा मी अधिक काय करु शकत होतो? असं संजू सॅमसन मॅच संपल्यानंतर म्हणाला. संजूने 62 बॉलमध्ये 119 रन्सची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार लगावले तर 7 उत्तुंग षटकार मारले. त्याची संघर्षपूर्ण शतकी खेळी राजस्थानला विजय मिळवून देऊ शकली नाही. पण या खेळीपेक्षा मी अधिक काय करु शकत होतो, असं संजू म्हणाला. (IPL 2021 RR vs PBKS Sanju Samson Super Century Against Rajasthan Royals Captaincy debut)
पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) 50 बॉलमध्ये 91 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 7 चौकार लगावले. तर आक्रमक बॅट्समन दीपक हुडाने (Dipak Hooda) कमाल केली. त्याने केवळ 28 बॉलमध्ये तडकाफडकी 64 रन्स ठोकल्या. राहुल आणि दीपकने तिसऱ्या विकेटसाठी 105 धावांची तडाखेबाज पार्टनरशीप केली. याच पार्टनरशीपच्या जोरावर पंजाबने 221 धावांचा डोंगर उभा केला.
संजू सॅमसन काय म्हणाला…?
“माझ्या भावनांचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. राजस्थानला जिंकून देण्याचं माझं ध्येय होतं. मला वाटतं की या खेळीपेक्षा मी अधिक काय करु शकलो असतो. मला वाटले की मी शेवटच्या चेंडूवर षटकार मारेल. मी मोठ्या ताकदीने तो बॉल मारलाही पण तो सीमारेषेबाहेर न जाता उंच उडाला आणि दीपक हुडाने त्याचं काम केलं. शेवटी हा सगळा खेळाचा भाग आहे. आम्हाला वाटले की विकेट चांगली होत आहे आणि आम्ही लक्ष्य गाठू पण आम्ही जिंकता जिंकता हरलो”, असं संजू सॅमसन म्हणाला.
शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी पाच धावांची गरज असताना मी षटकार ठोकून मॅच जिंकवू शकतो, असा आत्मविश्वास संजूला होता. परंतु अर्शदीपने स्लोवर वन चेंडू टाकत संजूला चकवलं. संजूने जोराचा फटका मारला आणि तो बॉल दीपक हुडाच्या हातात जाऊन स्थिरावला. शेवटी राजस्थानने सामना जिंकता जिंकता हरला. यावर बोलताना संजू म्हणाला, ‘काही सोपे झेल सुटतात, अवघड झेल घेतले जातात. हा खेळाचा भाग आहे’, असं संजू म्हणाला.