मुख्यमंत्री आजच निर्णय घेणार, नियमावलीही आजच तयार होणार : अस्लम शेख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि.१३ एप्रिल । “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची (Maharashtra Lockdown) घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली (Maharashtra Lockdown guidelines) आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी दिली. ते मु्ंबईत पत्रकारांशी बोलत होते. (Maharashtra Lockdown Updates CM Uddhav Thackeray to take decision and announce lockdown guidelines today said Minister Aslam Shaikh)

अस्लम शेख म्हणाले, “गेल्या आठवड्यापासून आपण मीटिंग घेऊन सगळे विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेत आहोत. टास्क फोर्सशी चर्चा झाली. आपण लोकांचीही मतं जाणून घेत आहोत. ब्रेक द चेन यानुसार आज निर्णय होईल. लॉकडाऊन करणे गरजेचं आहे. मुंबई शहरामध्ये किंवा या राज्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त टेस्ट केले आहेत. त्यामुळे केस जास्त आहेत.

साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावं लागणार आहे. त्याबाबत नियमावली आज जाहीर होणार आहे. परप्रांतियांना आपण घरी जाण्यासाठी अडवत नाही, असंही अस्लम शेख यांनी सांगितलं

राज्यात 12-13 दिवसांचा लॉकडाऊन, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रात लॉकडाऊन 12 ते 13 दिवसांचा असू शकतो, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. राज्यातल्या परप्रांतिय कामगारांनी महाराष्ट्र सोडू नका.तुमची सगळी काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल. महाविकास आघाडी सरकार आणि कामगार मंत्री म्हणून महाराष्ट्र तुमची काळजी घेईल याच आश्वासन देतो, असं मुश्रीफ म्हणाले.

परप्रांतिय नागरिकांनी गर्दी करून रेल्वे स्टेशन, बस स्थानकांवर गर्दी करू नये. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. लॉकडाऊन 12 ते 13 दिवसांचा असू शकतो, असं मुश्रीफांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *