महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि.१३ एप्रिल । आयपीएलच्या १४व्या हंगामात आज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. मुंबईचा पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पराभव केला होता. तर कोलकाताने हैदराबादचा पराभव केला होता. गुणतक्त्यात मुंबई पाचव्या तर कोलकाता दुसऱ्या स्थानावर आहे.
मुंबईचा पहिल्या लढतीत पराभव झाला असला तरी कोलकाताविरुद्ध त्याचे रेकॉर्ड जबरदस्त आहे. दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या २७ पैकी २१ लढतीत मुंबईने विजय मिळवलाय. गेल्या १२ लढतीत कोलकाताला फक्त एकच विजय मिळवता आला. आजच्या लढतीत कोलकाताची सर्वात मोठी डोकेदुखी असणार आहे ती त्यांची फिरकी गोलदाजी, जी रविवारी झालेल्या सामन्यात चालली नव्हती.
या सामन्यात मुंबई संघात क्विंटन डी कॉकचा समावेश होणार आहे. क्वारंटाइनमुळे तो पहिली लढत खेळू शकला नाही. आता तो निवडीसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सलामीला पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि डी कॉक येण्याची शक्यता आहे. यामुळे ख्रिस लीनला बाहेर बसवले जाईल. मुंबईकडे आघाडीच्या फळीत रोहित, डी कॉक, सूर्यकुमार यादव सारखे फलंदाज आहेत. तर मधळ्या फळीत पंड्या बंधू आणि कायरन पोलार्ड सारखे स्फोटक फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. यामुळेच KKRच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल.
संभाव्य संघ-
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, मॅक्रा जॅनसेन, ट्रेंट बोल्ट जसप्रीत बुमराह
कोलकाता नाइट रायडर्स: शुभमन गिल, नितिश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, इयान मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, हरभजन सिंग, वरुण चक्रवर्ती