आजचे राशिभविष्य: पहा तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.१४ एप्रिल ।

मेष : नशिबाचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखाद्या चांगल्या बातमीने दिवसाची सुरुवात होईल.आज जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास प्राधान्य द्याल. शुभ रंग : हिरवा | अंक : ८

वृषभ : नवीन ओळखी होण्याचे योग आहे. आजुबाजुच्या लोकांवर लक्ष ठेवा.कामधंद्यात काही अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक उलाढाली आज नकोत.शुभ रंग : जांभळा | अंक : ६

मिथुन : काही वरिष्ठ माणसे तुमच्या कामावर लक्ष ठेऊन आहेत. आज तुम्ही बुद्धीच्या जोरावर कठीण कामे मार्गी लावाल.जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण राहील.शुभ रंग : निळा | अंक : ७

कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. अचानक धनलाभ होईल. कामात उत्साह वाढेल. सडेतोड बोलण्यामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवा.शुभ रंग : जांभळा | अंक : ६

सिंह :आज तुम्ही तुमच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकता. मुलाखत किंवा नात्याबद्दल आज चर्चा होण्याची शक्यता आहे. अति श्रमांमुळे थकवा जाणवेल. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. संयम ठेवा. शुभ रंग : सोनेरी| अंक : ५

कन्या :कोणतेही काम जबाबदारीने करा. वाहन खरेदी करण्याची इच्छा होईल. सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळालकमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या चर्चा आज टाळलेल्याच बऱ्या. शुभ रंग : चंदेरी |अंक : ६

तूळ : आज तुम्ही आनंदी रहण्याचा प्रयत्न कराल. कोणत्याही कामाचे नेतृत्व केलात तर तुमच्यासाठी चांगले असेल, आज दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवास होतील.शुभ रंग : गुलाबी|अंक : ९

वृश्चिक : कमीत कमी वेळात चांगल्या लोकांसोबत भेटी घडू शकतात. त्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. प्रेमप्रकरणे मात्र डोक्याला नसता ताप देतील.शुभ रंग : राखाडी | अंक : ४

धनू : कोणत्या व्यक्तीसोबत संबंध सुधारण्यासाठी दिवस चांगला आहे. मोठी कामे हाताळण्यात संपूर्ण लक्ष राहील. अनेक कामे वेळेत पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आवडत्या छंदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.शुभ रंग : पिवळा | अंक : २

मकर : भावनांमध्ये चढ उतार पहायला मिळेल. आज खूप विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणत्या गोष्टीची काळजी न केल्यास दिवस चांगला जाईल. यश मिळण्याची शक्यता आहे.वास्तू खरेदीसाठी कर्जमंजुरी होईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.शुभ रंग : गुलाबी |अंक : १

कुंभ : नोकरी, व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. पैशांमुळे तुमचे काम अडणार नाही.कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. शुभ रंग : पांढरा |अंक : ३

मीन : आज तुम्हाला तुमचे महत्व कळेल. रोजची कामे वेळत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. जबाबदारी पार पाडण्याचा दिवस आहे. नवीन ओळखी होण्याचे योग आहे.सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस असून दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील.शुभ रंग : लाल |अंक : ६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *