महाराष्ट्र २४- गॅस सिलेंडरचा वापर जवळपास सर्वच घरांमध्ये होतो. याशिवाय सरकारच्या उज्जवला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर देण्यात येत आहेत. परंतु अनेकांना सिलेंडरबाबच्या महत्त्वाच्या नियमांबाबत माहिती नसते.
असाच एक नियम आहे सिलेंडरच्या होम डिलीवरीबाबत.
जर कोणत्याही गॅस सिलेंडर एजेन्सीकडून कोणत्याही कारणामुळे सिलेंडरची होम डिलीवरी न दिल्यास, सिलेंडर आणण्यासाठी एजेन्सीच्या गोडाऊनमध्ये जावं लागतं. अशाप्रकारे स्वत: गोडाऊनमधून सिलेंडर आणल्यास, एजेन्सीकडून १९ रुपये ५० पैसे दिले जाते. हे पैसे देण्यासाठी कोणतीही एजेन्सी नकार देऊ शकत नाही. गेल्या महिनाभरापूर्वी ही रक्कम वाढवण्यात आली होती. आधी डिलीवरी चार्ज १५ रुपये होता आणि १९ रुपये ५० पैसे करण्यात आला आहे.

कोणतीही एजेन्सी ही रक्कम देत नसल्यास 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर याची तक्रार करता येते. आता ग्राहकांना सब्सिडीवाले १२ सिलेंडर दिले जातात. १२ सिलेंडर पूर्ण झाल्यानंतर, मार्केट रेटनुसार सिलेंडर खरेदी करावा लागेल.

जर सिलेंडरचं रेग्युलेटर लीक असल्यास गॅस एजेन्सीकडून मोफत बदलता येतं. यासाठी एजेन्सीचं सब्सिक्रिप्शन व्हाऊचर असणं आवश्यक आहे.

जर रेग्युलेटर कोणत्याही कारणास्तव खराब झाल्यासही बदलता येतं. त्यासाठी एजेन्सी कंपनी टॅरिफनुसार रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम जवळपास १५० रुपये इतकी असते.
