महाराष्ट्र २४- मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चर्चेत आहे ती मनसे तर्फे काढण्यात येणाऱ्या रॅलीमुळे. येत्या ९ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अवैध पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना हाकलून द्या, या मागणीसाठी रॅली काढतेय. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काढण्यात आलेल्या रॅलीच्या मार्गावरून संभ्रम निर्माण झालेला. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई पोलिसांना दोन मार्ग सुचवले होते. दरम्यान मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रॅलीला परवानगी देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय.
मनसेच्या पत्रकातील मसुदा :
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. परंतु, पाकिस्तानी आणि बांगलादेशी माझे बांधव नाहीत. ते भारतीय नाहीत. त्यांना या देशातून हाकललंच पाहिजे. कारण भारत ही धर्मशाळा नाही. चला तर सामील व्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महामोर्चात. रविवारी दुपारी १२ वाजता ही रॅली निघणार आहे.
![]()
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राणीची बाग – आझाद मैदान आणि गिरगाव चौपटी – आझाद मैदान असे दोन मार्ग मुंबई पोलिसांना सुचवले होते. कायदा आणि सुव्यवसंस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राणीची बाग ते आझाद मैदान या मार्गाचा मनसेने वापर करू नये अशा सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या होत्या. अशातच आता मनसे रॅली ही गिरगाव चौपाटी व्हाया हिंदू जिमखाना अशी निघणार आहे.