महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि.१४ एप्रिल । राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) यंदाच्या आयपीएल (IPL 2021) मोसमात दुसरा धक्का बसला आहे. जोफ्रा आर्चरनंतर (Jofra Archer) आता त्यांचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) आयपीएलमधून बाहेर झाला आहे. हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे स्टोक्सला आयपीएलला मुकावं लागणार आहे. याआधी जोफ्रा आर्चर हातावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे बाहेर झाला होता. राजस्थान रॉयल्सचा पंजाबविरुद्धच्या (Rajasthan Royals vs Punjab Kings) सामन्यात पराभव झाला होता.
ब्रिटनमधलं वृत्तपत्र Independent ने दिलेल्या वृत्तानुसार क्रिस गेलचा (Chris Gayle) कॅच पकडत असताना बेन स्टोक्सला दुखापत झाली होती. त्याआधीही स्टोक्सने एक कॅच सोडला होता. लॉन्ग ऑनवर फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या स्टोक्सने धावत गेलचा कॅच पकडला होता, यानंतर तो मैदानातच पडला. तेव्हाच त्याला दुखापत झाली, पण तरीही तो उरलेली मॅच खेळला. बॅटिंग करत असताना स्टोक्स तीन बॉल खेळून शून्य रनवर आऊट झाला.
मिळालेल्या माहितीनुसार बेन स्टोक्स एक आठवडा भारतामध्येच राहिल. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात स्टोक्सच्या दुखापतीवरुन चर्चा सुरू आहे. गुरूवारी स्टोक्सचा एक्स-रे काढण्यात येईल. यानंतर त्याच्या दुखापतीबाबत माहिती मिळेल, तेव्हा इंग्लंड क्रिकेट बोर्ड निर्णय घेईल. भारताविरुद्धच्या सीरिजवेळी जोफ्रा आर्चरला दुखापत झाली होती. यावर्षी भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्यामुळे स्टोक्सबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्ड कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.