महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि.१४ एप्रिल । सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटने यंदा मान्सूनमध्ये १०३% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. २०१९ मध्ये ११०% आणि २०१९ मध्ये १०९% पाऊस झाला होता. मान्सूनमध्ये सामान्यत: एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाल्यास पुढील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस असे चक्र असते. मात्र हवामानाच्या इतिहासात यापूर्वी १९९६ मध्ये १०३.४%, १९९७ मध्ये १०२.२% व १९९८ मध्ये १०४% पाऊस नोंदवला होता.
स्कायमेटचे वैज्ञानिक आणि उपाध्यक्ष महेश पलावत म्हणाले, जून ते सप्टेंबर या काळात देशात सामान्यपणे ८८०.६ मिमी पाऊस पडतो. यंदाच्या पावसाळ्यात ९०७ मिमी पावसाची शक्यता आहे. हे प्रमाण सरासरीच्या १०३% आहे. ९६ ते १०४% पाऊस झाल्यास मान्सून सरासरी श्रेणीत गणला जाताे. तथापि, या आकलनात ५ टक्क्यांची घट-वाढ होण्याचीही शक्यता पलावत यांनी व्यक्त केली आहे.