केरळमध्ये कोरोनाचा तिसरा रूग्ण आढळला.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४-  केरळमध्येकोरोना विषाणूचा तिसरा रूग्ण आढळला आहे. देशात आतापर्यंत मिळून कोरोना विषाणू संक्रमित तीन रूग्ण आढळले आहेत. तिन्ही रूग्ण केरळचे आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शालिजा यांच्या माहितीनुसार, हा व्यक्ती काही दिवसांआधी वुहान प्रांतातून परतला होता. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. हा रूग्ण केरळच्या कासरगोडेतील आहे.

केरळमध्ये जवळपास २००० लोक देखरेखीखाली 

केरळमध्ये जवळपास २००० लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यातील काही जणांना स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तर ७५ जणांना विविध रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, याआधी ज्या दोन लोकांना कोरोना विषाणूंचे संक्रमण झाले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

केरळ सरकारने सांगितले की, दुसरा रूग्णदेखील चीनमधील वुहान येथे शिक्षण घेत होता. आणि २४ जानेवारीला केरळहून परतला होता.
भारतामध्ये पहिला रूग्ण केरळमध्येच आढळला होता. वुहानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीमध्ये हे कोरोना विषाणूच्या संक्रमणाची पुष्टी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *