धोनीला संघात स्थान मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये करावी लागेल उत्तम कामगिरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४-  मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या टीममधून बाहेर आहे. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. धोनी भारतीय टीममधून दूर असला तरी त्याचे फॅन अजूनही त्याला मिस करतात. न्यूझीलंडमध्ये देखील हे दिसलं होतं. या सीरीजमध्ये धोनीच्या जागी केएल राहुलने विकेटकिपींग केली. या सामन्यांमध्ये युवा विकेटकीपर ऋषभ पंतला संधी नाही मिळाली. लोकेश राहुल सध्या चांगली कामगिरी करत आहे. विराट कोहली देखील त्याच्या बाबत सकारात्मक असतो. लोकेश राहुल विकेटकिपिंग बरोबरच ओपनिंग आणि चांगली बॅटींग देखील करतो. 

केएल राहुल आयपीएलमध्ये देखील विकेटकिपिंग करतो. आतापर्यंत त्याची कामगिरी चांगली ठरली आहे. टी-२० सह वनडेमध्ये देखील त्याच्या बॅटने रन काढले आहेत. टी-२० मध्ये शेवटच्या ८ आणि वनडेमध्ये शेवटच्या ५ सामन्यांमध्ये त्याने ५० च्या रनरेटने रन काढले आहेत. त्याच्या चांगल्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडमध्ये ही ५-० ने विजय मिळवला आहे.

न्यूझीलंड विरुद्ध भारतीय टीम ३ वनडे सामने आणि २ टेस्ट सामने देखील खेळणार आहे. शेवटच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा रिटायर हर्ट झाल्यामुळे ही जबाबदारी केएल राहुलने यशस्वीपणे पार पाडली.

विकेटकीपिंग करत जर केएल राहुल बॅटींगमधूनही ही चांगली कामगिरी करत असेल तर मग विकेटकीपर ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला संधी मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

केएल राहुल जर अशीच कामगिरी करत राहिला तर आगामी वर्ल्डकपमध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळणं कठीण आहे. कर्णधार विराट कोहलीसह बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली देखील त्याच्या कामगिरीवर खूश आहे. महेंद्र सिंह धोनीला संघात पुन्हा जागा मिळवायची असेल तर त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन दाखवावी लागेल. त्यामुळे धोनीकडे आयपीएल हाच सध्या एक पर्याय दिसतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *