मी व्यक्तिगत कुणाचा उल्लेख केलेला नाही ! भावना दुखावली गेली असेल तर मी माफी मागतो. आशिष शेलारांचा माफीनामा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- महाराष्ट्रात आज सकाळीच वाद पेटला तो मुख्यमंत्र्यांनी सामानाला दिलेल्या मुलाखतील वक्तव्यावरून आणि त्यावर आलेल्या भाजप नेते आशिष शेलार यांच्या प्रतिक्रियेवरून.  “राज्यात नवा नागरिकत्व कायदा लागू होणार नाही” असं परखड मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत मांडलंय. यावरून आशिष शेलार यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आणि महाराष्ट्र सरकारवर एकेरी शब्दात त्यांनी टीका केली. “हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे, अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?” या एकेरी शब्दात आशिष शेलार यांनी टीका केली होती.

दरम्यान आता आशिष शेलार यांनी आपल्या ‘त्या’ वक्तव्याची माफी मागितली आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल खुलासा केलाय. या पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणालेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत त्यांनी राज्य पुढे कसं नेईन, शेतक-यांना कसा दिलासा देतील, युवकांचे-रोजगाराचे प्रश्न कसे सोडवतील ? याचा रोडमॅप असावा अशी अपेक्षा होती पण यात अनैसर्गिक आघाडीचा खुलासा होता. ही सपशेल अपयशी मुलाखत आहे

दरम्यान वादग्रस्त वक्तव्याकर बोलताना आशिष शेलार म्हणालेत, “मी व्यक्तिगत  कुणाचा उल्लेख केलेला नाही. माझ्या वक्तव्याने जर कुणाची भावना दुखावली गेली असेल तर मी माफी मागतो. सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर वक्तव्य केलं, यावरून राजकीय हेतुने घेतलेले निर्णय कसे पचवता येत नाहीये हे यातून दिसतंय. आम्हाला कोणाला हिंदुत्व शिकवायचं नाहीये पण जनतेच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही विचारणार. जे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे ते दिसतंय का? असा प्रश्न आहे”, असं शेलार म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *