महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी। दि.१७ एप्रिल ।पंढरपूर । एकी कडे राज्यात कोरोना चा कहर चालू आहे तर आज (दि.17) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. तब्बल 19 उमेदवार रिंगणात आहेत. पंढरपूरचा भावी आमदार ठरवण्यासाठी सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळेत दोन्ही तालुक्यांतील 524 मतदान केंद्रांवर 3 लाख 40 हजार 889 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
गेल्या महिन्याभरात या मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सत्ताधार्यांवर, तर सत्ताधार्यांनी विरोधकांवर आरोपप्रत्यारोप केले. त्यामुळे मतदार आता कोणाला कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पोटनिवडणुकीनिमित्ताने महिन्याभरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पंढरपूरची पोटनिवडणूक जरी बहुरंगी असली तरी खरा सामना हा राष्ट्रवादी व भाजपमध्येच होणार आहे.