कोरोनापासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा; आहारात करा यांचा समावेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.१८ एप्रिल । पुणे । कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवावी लागणार आहे. यासाठी आपल्याला चांगला आहार घ्यावा लागणार आहे. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यास मदत होईल. (Cinnamon, cardamom and cloves are beneficial for boosting the immune system)

# दालचिनी
दालचिनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपल्या चेहर्‍यावरील मुरुम कमी होण्यास मदत होते.

# वेलची
वेलचीमुळे आपल्या फुफ्फुसात जलद रक्त संचार होतो. यामुळे दमा, तीव्र सर्दी आणि खोकला यासारख्या श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून आराम मिळतो. आयुर्वेदात वेलची उष्ण पदार्थ मानली जाते, जी शरीराला उबदारपणा देते. वेलची कमी प्रमाणात सेवन केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपल्या शरीरातील बहुतेक रोग उच्च रक्तदाबमुळे उद्भवतात. जर आपण दररोज कमीतकमी 3 वेलची खाल्ली, तर आपला संपूर्ण रक्तदाब नियंत्रणात राहील

# लवंग
लहानशी दिसणारी लवंग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लवंगमध्ये पोटॅशियम, प्रथिने, लोह, सोडियम, कर्बोदके, कॅल्शियम आणि हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण देखील असते. लवंगामध्ये व्हिटामिन ए आणि सी देखील आढळतात. तसेच त्यात मॅग्नेशियम आणि फायबर देखील भरपूर प्रमाणत आढळतात. लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.

# हळद
हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप प्रतिबंधित करते. तसेच, हळदीत भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाकते. हळदीचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित सर्व समस्यांचा धोका कमी होतो. हळद शरीरातील इन्सुलिन संतुलित करते. तसेच, ग्लूकोज नियंत्रित करते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही हळद खूप फायदेशीर ठरते.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *