महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.१८ एप्रिल । पिंपरी चिंचवड । राज्य सरकारने व पिपरी चिंचवड महानगर पालीका आयुक्तांनी लाॅकडावून च्या कालावधीत टॅक्स चे कॅल्क्युलेशन करून सरकारी तिजोरीत टॅक्स भरणाऱ्या वर्गाला ( C.A. व Tax Practitioners ) अर्थव्यवस्थेशी निगडीत सेवा म्हणून Exempted category मध्ये टाकण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.
.देशाच्या अर्थव्यवस्थेचा स्तोत्र टिकून राहण्याच्या दृष्टीकोनातून अतीशय योग्य असा हा निर्णय आहे…..तसेच सदर कामे करणाऱ्यांसाठी सुद्धा फायदेशीर ठरला आहे…. कारण उद्योजक व व्यापारी वर्गा च्या उलाढालीनुसार शेकडो ते हजारो बिलांची गोळाबेरीज करून GST Tax ची GSTR1 व GSTR3B ची पत्रके (Returns) दाखल करावी लागतात आणि त्या साठी एक तारखे पासून ते विस तारखेपर्यंत सारखी धावपळ करावी लागते…. सरकारच्या तिजोरीत GST रूपात कर भरण्याचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या वर्गाला कमी पडतो म्हणून त्यांना कार्यालय सुरू ठेवायची परवानगी दिलेला हा निर्णय दिलासा देणारा व सध्याच्या कठीण परिस्थितीत अर्थव्यवस्थेलाही. पुरक आहे.