महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.१९ एप्रिल । मुंबई । देशात २०२०२ मार्च मध्ये कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. ऑगस्टपर्यंत सोन्याचे दर प्रतितोळा 55 हजाराच्या पुढे गेले होते. मार्च २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमतीतही वाढ दिसून येत आहे.
फेंब्रुवारी मार्च महिन्याच्या दरम्यान सोन्याच्या किंमती ४३ हजार ७०० पर्यंत घसरल्या होत्या. परंतु कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे आणि बाजारातील चढउतारामुळे सोन्याचे भाव पुन्हा वाढत आहे. आज मुंबईतील सोन्याचे दर ४६ हजार ०२० रुपये प्रतितोळा इतके आहेत.
गुड रिटर्न वेबसाईट नुसार १० एप्रिल ला सोने ४५ हजार ७०० रुपये प्रतितोळे होते. गेल्या ८ दिवसात सोन्याच्या दरांमध्ये साधारण ३२० रुपये प्रतितोळा इतकी वाढ झाली आहे. आज २४ कॅर्रेट सोन्याचा भाव ४६०२० प्रति तोळा इतका आहे .
गुड रिटर्न वेबसाईट नुसार आज चांदीचा दर प्रतिकिलो ६८६०० इतका आहे .